मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (15:41 IST)

फोन टॅपिंग प्रकरण : पुणे पोलीस नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

nana patole
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात  पुणे पोलीस आज मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांचा जबाब नोंदवणार आहेत. रश्मी शुक्ला यांनी अमजद खान  नावाने नाना पटोलेंचे फोन टॅप केले होते.
 
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्यमंत्री बच्चू कडू, एकनाथ खडसे, आशिष देशमुख, संजय काकडे, नाना पटोले यांच्यासह काही नेत्यांचे फोन बोगस नावाने रश्मी शुक्ला यांनी टॅप केले होते. बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे.
 
दरम्यान, या प्रकरणात अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळी नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र नाना पटोले यांचा देण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. आज दुपारी 2 वाजता पुणे पोलीस नाना पटोलेंचा मुंबईत जबाब नोंदवणार आहेत.