गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (21:56 IST)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं

sambhaji bhide
पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे  यांच नाव वगळण्यात आलं आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे सापडले नसल्यानं त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी ही माहिती आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 41 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हिंसाचारात संभाजी भिडे यांचा कोणताही सहभाग असल्याचे पुरावे नाहीत अशी माहिती पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.
 
पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 ला दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर राज्यभरात मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधीत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचंही नाव यामध्ये होतं. यासोबतच मिलिंद एकबोटे हे देखील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत. त्यानंतर आता आज पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून पुरावे न मिळाल्याने संभाजी भिडे याचं नाव आरोपींच्या यादीतून वगळलं आहे.