मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (20:05 IST)

सभागृहाचा स्लॅब कोसळून, पाच कामगार जखमी, एक ठार

Mumbai building
पुण्याच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला .या अपघातात पाच कामगार जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात भोरी समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना समवारी सायंकाळी हा दुर्देवी प्रकार घडला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना खालून दिला जाणारा सपोर्ट निसटला आणि स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून काम करणारे 5 कामगार जखमी झाले.तर एका मजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. राम नरेश पटेल(वय वर्ष 45 रा.वानवडी) असे या मयत मजुराचे नाव आहे. तर छत्रसिंग धूमकेती(वय वर्ष 28), बरसिंग परटा(वय 37), संदीपकुमार उलके(वय 18) दीपचंद मराबी(वय वर्ष 27),अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
 
वानवडी परिसरातील अलंकार हॉल समोर भोरी समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु आहे. ठेकेदाराला हे बांधकाम देण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील स्लॅब टाकण्याचे काम सुरु असता स्लॅब टाकण्यासाठी खाली लाकडाचा सपोर्ट देण्यात आला होता. काही मजूर खाली काम करत होते तर काही मजूर स्लॅब भरण्याचे काम करत होते. दुपारी चारच्या सुमारास स्लॅबला सपोर्ट दिलेला लाकूड निसटला आणि स्लॅब कोसळला. त्यात पाच कामगार अडकले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला आणि वानवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असता हडपसर अग्निशमन दल आणि वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत स्थानिकांनी तीन कामगारांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक होती. उपचाराधीन असता त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला.