मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (16:14 IST)

भीषण अपघातात एक ठार, 11 जखमी

आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यात मुल तालुक्यात आकापूर जवळकरीमनगर निघालेले ओडिसातील मजुरांच्या वाहनाचा अपघात होऊन या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या मधील इतर 11 जण गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मध्ये मयत महिलेची ओळख पटू शकली नाही. हे मजूर ओडिसा येथून करीम नगर ला निघालेले होते. हे मजूर चारचाकी वाहनात होते. सकाळी हे वाहन मुल तालुक्यात आकापुराजवळ पालटले. या मध्ये एक महिला जागीच ठार झाली. तर इतर 11 जण जखमी झाले .त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे कारण समजू शकले नाही.