1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (14:11 IST)

बोटिंग करताना बोटीवर खडक कोसळून 7 प्रवाशांचा मृत्यू, 32 जखमी , 20 बेपत्ता

ब्राझीलच्या मिनास गैरेस राज्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे फर्नास तलावात बोटिंग करताना काही बोटींवर मोठा खडक पडला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 32 जण जखमी झाले. याशिवाय 20 लोक बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. फर्नेस तलावावर लोक बोटीवरून जात असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान खडकाचा मोठा भाग तुटून बोटींवर पडला.
मिनास गैरेस अग्निशमन दलाचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेवो डी सिल्वा यांनी या घटनेची माहिती दिली आहे. एस्टेवो डी सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 7 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 32 लोक जखमी झाले आहेत. 20 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे.
3 प्रवाशी बोट वर खडक आदळली , एस्टेव्हो म्हणाले की, हा अपघात साओ जोस डा बारा आणि कॅपिटोलियो शहरांदरम्यान घडला. खडकाचा एक मोठा तुकडा तुटून कॅपिटोलियो परिसरातील फर्नास तलावात पडला. या दुर्घटनेत 3 पर्यटक बोटी अडकल्या.
पावसामुळे अपघात झाला
मिनास गैरस चे गव्हर्नर रोमू जेमा यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसामुळे कॅपिटोलियोमधील फर्नास तलावातील खडकाचा काही भाग कोसळला. जेमा यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही लोकांना आवश्यक संरक्षण आणि मदत देण्यासाठी काम करत राहू. बेपत्ता लोकांचा शोध सुरूच राहील, जरी गोताखोर त्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्री त्यांचा शोध थांबवतील.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून नौदलाने शोध आणि बचाव कार्यात सामील होण्यासाठी मदत दलाची टीम तैनात केली आहे.