शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (17:20 IST)

कोरोना आता या फळामध्ये आढळला

सध्या जगभरात कोरोना पुन्हा झपाट्याने वाढत आहे . कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग दुप्पट वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. कोरोनानंतर लोकांचे जीवन झपाट्याने बदलले आहे. पाळीव प्राण्यांमुळे देखील कोव्हीड होऊ शकत, असे तज्ज्ञ सांगत आहे. स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आता हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की कोरोना विषाणू आता खाद्य पदार्थांमध्ये देखील आढळत आहे. आपण भाजीपाला देखील धुवून खायचो. पण आता फळांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळल्या मुळे भीती वाढली आहे. 
चीन मधील ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना विषाणू आढळून आले आहे. हे ड्रॅगन फ्रुट व्हिएतनाम मधून आलेली आहे. वृत्तानुसार, या मुळे चीनचे सुपरमार्केट बंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी झाली आहे. तर व्हिएतनाममधून होणाऱ्या आयातीवर 26 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या झेजियांग आणि जिआंगशी प्रांतातील सुमारे नऊ शहरांमध्ये फळांच्या चाचण्यांमध्ये कोविडची पुष्टी झाली आहे. नंतर ज्यांनी ही फळे खरेदी केली त्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर चीन मध्ये इतर देश आणि परदेशातून येणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. 
भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अनेक देशात पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला आहे. लोक पुन्हा घरात कैद होत आहे.