मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (19:32 IST)

अमेरिकेचे संरक्षण मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले , स्वतःला होम क्वारंटाईन केले

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली आहे . ऑस्टिन यांनी सांगितले की, माझी कोविड-19 ची चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. सुट्टीवर घरी असताना मला कोरोनाची लक्षणे आढळली. लक्षणे सौम्य आहेत. त्यांनी म्हटले आहे की ते आता व्हर्चुवल पद्धतीने सभांना उपस्थित राहणार आहे . त्यांनी सांगितले की, मी आता 5 दिवस होम क्वारंटाईनमध्येच राहणार आहे. त्यांनी सांगितले की ते 21 डिसेंबर रोजी अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली होती. आणि शेवटी गुरुवारी पेंटागॉन ला गेले होते.