गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (11:38 IST)

बीड येथे एसटी बसचा भीषण अपघात, 6 जण जागीच ठार, 8 गंभीर जखमी

Terrible bus accident at Beed
बीड येथे एसटी बस आणि ट्रक मध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला .या अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर 8 प्रवाशी गंभीतरीत्या जखमी झाले आहे. हा अपघात सकाळी  लातूर- आंबेजोगाई मार्गावर झाला. 
सकाळी लातूर- औरंगाबाद एसटी बस लातूर बस आगारातून निघाली असता आंबेजोगाईवरून लातूरच्या दिशेने प्लास्टिक पाईप घेऊन निघालेला ट्रकशी बर्दापूर फाट्याजवळ वळणावर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बस आणि ट्रक एकमेकांमध्ये घुसले होते. या अपघातामुळे बस मध्ये बसलेले प्रवाशी गोंधळून गेले आणि या अपघातात 6 प्रवाशी जागीच ठार झाले तर 8 प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहे. अपघाताचे समजल्यावर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.