वृद्ध महिलेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा
अमरेली: सावरकुंडला येथील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिरात एक विचित्र घटना समोर आली आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांनी एका वृद्ध महिलेच्या वरच्या पापणीतून 250 हून अधिक उवा आणि 80 अंडी शस्त्रक्रिया करून काढली. गीताबेन मेहता या वृद्ध महिलेला गेल्या दीड महिन्यापासून डोळ्यांच्या आजाराने ग्रासली होती. त्यांना गेल्या दीड महिन्यांपासून डोळ्यात खाज येणे, जळजळ होणे, पापण्या जड होण्याची तक्रार जाणवत होती.
जेव्हा त्या सावरकुंडला येथील आरोग्य मंदिरात तपासणीसाठी गेल्या तेव्हा डॉक्टरांना सूक्ष्मदर्शकाद्वारे तिच्या वरच्या पापणीवर असंख्य उवा दिसल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये 250 हून अधिक उवा आणि 80 अंडी काढल्या गेल्या.
डोळ्याभोवतीच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव आढळल्याने वैद्यकीय शास्त्रात आश्चर्याचा धक्का बसला. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर, डॉ. मृगांक पटेल यांनी 66 वर्षीय गीताबेन यांच्या डोळ्यातून 250 हून अधिक उवा आणि 80 अंडी यशस्वीरित्या काढली, ज्यामुळे महिलेला आराम मिळाला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
खरं तर उवा डोक्यात आढळतात पण पापण्यात उवा होणे हे दुर्मिळच आहे. केसांमधील संसर्ग, अस्वच्छतेमुळे असे होणे डॉक्टरांचे मत आहे.