गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: मंगळवार, 16 सप्टेंबर 2025 (09:34 IST)

साताऱ्यात एकाचवेळी महिलेने दिला चार मुलांना जन्म, या पूर्वी तीन मुलांची आई झाली

Woman gives birth to 4 children
freepik
सातारा जिल्ह्यात एक अतिशय आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. ही महिला आधीच तीन मुलांची आई होती आणि आता या प्रसूतीनंतर ती एकूण सात मुलांची आई बनली आहे. या घटनेने स्वतः डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.
हे प्रकरण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आहे. काजल खाकुर्डीया नावाच्या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिला तातडीनं सरकारी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची यशस्वी सी सेक्शनद्वारे प्रसूती केली तिने तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला. तीची आणि तिच्या बाळांची प्रकृती उत्तम आहे.
मुलांचे वजन कमी आहे. त्यांना डॉक्टरच्या देखरेखीखाली अतिदक्षतविभागात ठेवण्यात आले आहे. 
काजल एका साध्या कुटुंबातून येते आणि तिचा पती विकास पुण्यात गवंडी काम करतो. या प्रसूतीनंतर त्यांच्या घरात आनंदाची लाट उसळली आहे.
काजलला यापूर्वी दोन प्रसूती झाल्या आहेत:
पहिली प्रसूती: तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.
दुसरी प्रसूती: तिने एका मुलीला जन्म दिला.
तिसरी प्रसूती: आता तिने एकत्रितपणे चार मुलांना जन्म दिला आहे.
अशाप्रकारे, तीन प्रसूतींनंतर, काजल आता एकूण सात मुलांची आई बनली आहे, जी स्वतःच एक दुर्मिळ आणि आनंदाची गोष्ट आहे.
Edited By - Priya Dixit