बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (12:57 IST)

भाविकांची कार एसटीला धडकली; एक ठार , आठ जखमी

पंढरपूर वरून विठ्ठलाचे दर्शन करून गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर आठ जण जखमी झाले आहे. 
 
पंढरपूर-मोहोळ मार्गावरील देगाव शिवारातील नाईकनवरेमळा येथे रविवारी सकाळी हा अपघात झाला . या अपघातात कार आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन कार मधील एक जण जागीच ठार झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. तर एसटी मधील दोघे जण जखमी झाले आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने पंढरपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
लातूर मधील सहा भाविक रविवारी सकाळी कार मधून चालले होते. देगाव शिवारातील नाईक नवरेमळा येथे एका दुसऱ्या कार ला ओव्हरटेक करण्यात या भाविकांची कार समोरून येणाऱ्या एसटीला धडकली. या धडकेत कार मधील सहा जण जखमी झाले. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय रामराव भोसले वय वर्ष 45 असे मृत्युमुखीचे नाव आहे. 
 
अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोळंबलेलीं  वाहतूक सुरु केली. या बाबत एसटी बसचालक यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करत आहे.