शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (12:32 IST)

बिहार अपघात :मोतिहारीच्या सीकरहना नदीत होडी बुडाली, 20 बेपत्ता, एक ठार, पाच गंभीर जखमी

बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी सकाळी 10 वाजता मोठा अपघात झाला आहे. जिल्ह्यातील चिरैया प्रभागाच्या सिकारहना नदीत 25 लोकांनी भरलेली होडी बुडाली.या अपघातात 20 जण बेपत्ता आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.पाच जण गंभीररित्या जखमी असल्याचे सांगितले जात आहे.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होडीतील प्रत्येकजण गवत आणण्यासाठी चढला होता. एका महिलेसह दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
 
होडी बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.या अपघातात चार महिला जखमी आहेत. एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या टीम घटनास्थळी उपस्थित आहेत. एसडीआरएफची टीम पोहोचत आहे.गोताखोर बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता लोकांच्या कुटुंबांची अवस्था अत्यंत बिकट आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.