मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (14:55 IST)

रशियन विद्यापीठातील गोळीबारात 8 जण ठार

रशियातल्या परम शहरातील एका विद्यापीठात झालेल्या गोळीबारात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत किती जण जखमी झालेत, याविषयी स्पष्ट माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
 
हल्लेखोर याच विद्यापीठातील विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतावेळी तो जखमी झाला आहे.
 
परम स्टेट यूनिव्हर्सिटी ही राजधानी मॉस्कोपासून पूर्व दिशेला 1300 किलोमीटर अंतरावर आहे.
 
बीबीसी प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 11 वाजता एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाली आणि त्यानं गोळीबार सुरू केला.
 
हा हल्ला सुरू असताना काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वत:ला एका इमारतीत बंद करून घेतलं.
 
घटनास्थळी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओत काही लोक खिडकीतून खाली उडी मारत असताना दिसत आहेत.