मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (21:07 IST)

वसंत मोरे सध्या राज्याच्या बाहेर...मनसे वरील नाराजी कायम?

vasant more
पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (जवळ केलेल्या कट्टर व आक्रमक हिंदुत्त्वाच्या मुद्द्यामुळे स्वत: मनसेतीलदेखील अनेक नेते- कार्यकर्ते  हे पक्षावर तसेच पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. या सर्व नाराज असलेल्या मनसे नेते-कार्यकर्त्यांमधील सर्वात मोठं व चर्चेतील नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे.
 
आता मनसेकडून राज्यभरात महाआरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन तसेच, मशिदींसमोरील भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लाविण्याचं प्रयोजन केलं जात असताना आता वसंत मोरे मात्र महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वत: आपल्या निवासस्थानी 'शिवतीर्थ' इथे भेट घेतली होती. त्यानंतर, वसंत मोरे यांनी आपण पक्षाच्या सोबत असल्याची भुमिका स्पष्ट केली होती.
 
मात्र, आता मनसेचे महत्त्वाचे कार्यक्रम नियोजित असताना मनसे नेते व मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे मात्र सध्या तिरूपती बालाजीला गेले आहेत. औरंगाबाद येथील सभेला उपस्थिती दाखविल्यानंतर आता वसंत मोरे हे थेट तिरुपतीला गेले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठीच्या इतक्या महत्त्वाच्या काळात वसंत मोरे मात्र राज्याच्या बाहेर असल्याने आता वसंत मोरे हे अजूनही नाराज आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.