1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (11:08 IST)

अंत्यसंस्काराच्या वेळी डिझेलचा भडका उडून 11 जण गंभीर जखमी

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये एकूण 11 जण गंभीररीत्या भाजले. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अंत्यसंस्कार (दहन) प्रक्रियेत शेवटचा अग्नी देताना चितेवर डिझेल टाकण्यात आले असता डिझेलचा भडका उडाला आणि जवळपास असलेले 11 जण त्यात होरपळून गंभीर रित्या जखमी झाले. 
 
पुण्यातील ताडीवाला रोडवरील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार सुरू असताना झालेल्या अपघातात सुमारे 11 जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. कैलास स्मशानभूमीत सायंकाळी 7 वाजता ही घटना घडल्याचे पोलिस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आधीच जळत असलेल्या चितेवर इंधन टाकले असता ती वाहून गेली आणि आग पसरली. सुमारे 11 जण भाजले.
 
अशा प्रकाश कांबळे (वय 59), येणाबाई बाबू गाडे (वय 50), निलेश विनोद कांबळे(35),शिवाजी बाबुराव सूर्यवंशी (वय 55), वसंत बंडू कांबळे(74), दिगंबर श्रीरंग पुजारी(वय 40), हरीश विठ्ठल शिंदे (वय 40),आकाश अशोक कांबळे(वय 36),शशिकांत कचरू कांबळे(वय 36),अनिल बसंना शिंदे(वय 53),अनिल नरसिंग घटवळ यांचा समावेश आहे.या अपघातात माजी महापौर रजनी त्रिभुवन थोडक्यात बचावल्या. आगीत भाजलेल्या एका व्यक्तीने रजनी कवडे यांच्या साडीचा आधार घेतल्याने या मध्ये त्याही काही प्रमाणात जखमी झाल्या आहे. 
 
पाटील म्हणाले, 'या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने सेसनाश जनरल हॉस्पिटल आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आम्हीही घटनेचा तपास करत आहोत. त्याच वेळी, आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोक खूप भाजले आहेत. ते म्हणाले की, दीपक कांबळे नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत असताना ही दुर्घटना घडली.
 
पोलीस अधिकाऱ्याने असेही सांगितले की, अपघातात भाजलेले सर्व लोक दीपक कांबळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. कांबळे यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 80 लोक स्मशानभूमीत उपस्थित होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. दीपक कांबळे यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर शोकाकूल कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील ताडीवाला रोडवरील स्म्शानात  नेले असता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.