1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (10:26 IST)

औरंगाबाद जाण्यापूर्वी पुण्यात राज ठाकरेंसाठी महापूजा, 200 पुरोहितांची उपस्थिती असणार

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.1  मे  रोजी औरंगाबाद त्यांची जाहीर सभा होणार आहे. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात दौरा आहे. आज ते 1 मेच्या सभेसाठी रवाना होतील. तत्पूर्वी राज ठाकरे ते पुण्यातील मुक्कामात औरंगाबाद जाहीर सभा, 3 मे च्या महाआरतीचे आयोजन व 5 जूनच्या अयोध्येच्या दौराबाबत मनसे नेत्यांशीचर्चा करणार आहे. तत्पूर्वी औरंगाबाद जाण्यापूर्वी त्यांच्या राहत्या घरासमोर 100  200 गुरुजी आणि पुरोहितांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना पुढील कार्यासाठी यश प्राप्त व्हावे असा आशीर्वाद हे सर्व गुरुजी देणार असल्याची माहिती पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 
 
 या धार्मिक विधी नंतर ते वढू येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ जाऊन आशीर्वाद घेतील. त्यानंतर ते औरंबागावबंद सभेसाठी मार्गस्थ होतील.  त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा गाडयांचा ताफा असणार आहे. पुणे ते औरंगाबाद मार्गावर जागोजागी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी  मनसे कडून करण्यात आली आहे. 

राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार या कडे आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.