गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (11:51 IST)

CNG Price Hike: राज्यात या शहरात सीएनजीच्या दरात वाढ

CNG Price Hike: Increase in CNG price in this city in the state CNG Price Hike: राज्यात या शहरात सीएनजीच्या दरात वाढ
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG च्या किरकोळ किंमतीत प्रति किलो 4 रुपयांनी वाढ केली आहे. तथापि, कंपनीने पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किरकोळ किंमतीत वाढ केलेली नाही. नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या किमतीत 110 टक्क्यांनी मोठी वाढ केल्यानंतर ही किंमत वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
MGL ने 6 एप्रिल 2022 पासून तिसऱ्यांदा CNG च्या किमती वाढवल्या आहेत. एमजीएलने शुक्रवारी सांगितले की मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीची किंमत 76 रुपये प्रति किलो असेल आणि देशांतर्गत पीएनजीच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
 
पुण्यातही दरवाढ करण्यात आली
राज्यातील  पुणे शहरातही  29 एप्रिल रोजी सकाळी सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.20 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुण्यात सीएनजीचा नवा दर 77.20 रुपये किलो झाला आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात झालेली ही सलग चौथी वाढ असून त्याआधी 6 एप्रिल, 13 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती.
 
आता पुणे शहरात सीएनजीचा दर 77.20 रुपयांपर्यंत वाढला आहे.नवे दर 77.20 रुपये किलो झाले आहे. एप्रिलमध्ये सीएन जी 62.20 रुपये होती. नंतर 68 रुपयांपर्यंत वाढ झाली. नंतर ते 73  रुपये करण्यात आली नंतर 2 रुपयांनी वाढवून 75 रुपये झाले आता पुन्हा शुक्रवारी त्याचे दर वाढवून 77.20 रुपये झाले आहे. एप्रिल महिन्यात आता पर्यंत चारवेळा किमती वाढल्या आहेत. 
 
रशिया युक्रेन युद्धा मुळे संकटे वाढली आहे. सागरी महामार्गाने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे देखील याचा परिणाम झाला आहे.