1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (11:57 IST)

या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस तर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather updates
राज्यात एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे तर दुसरीकडे पाऊस पडणार अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. 
 
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
 
या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.  तर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
या जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण
अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्णतेची लाट येणार त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.