सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:04 IST)

IPS कृष्ण प्रकाश यांच्या अडचणीत वाढ; राष्ट्रवादीच्या आमदाराचं चौकशीसाठी पत्र

krishna prakash
पिंपरी चिंचवड : शहराचे माजी पोलीस आयुक्त आणि कृष्ण प्रकाश (Krushna Prakash) हे नेहमची आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. कृष्ण प्रकाश यांनी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून तब्बल 200 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या कथित पत्रातून करण्यात आला आहे. या गोष्टीमुळे ते अडचणीत सापडेले असतानाच आता आणखी एक प्रकार घडला आहे.
 
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही आता कृष्ण प्रकाश यांच्यावर आरोप केले आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना बनसोडे यांनी हे पत्र लिहीलं आहे. कृष्ण प्रकाश यांची कारकीर्द ही अत्यंत संशयास्पद असून, या काळात मोठे अवैध्य उद्योग झाल्याचे आरोप बनसोडे यांनी केले आहेत. त्यामुळे कृष्ण प्रकाश यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
 
दरम्यान, कृष्ण प्रकाश यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, सुडबुद्धीनं हे आरोप करण्यात आल्याचं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे. आपण पिंपरी चिंचवड शहरात केलेलं काम हे लोकांना आवडलं होतं. प्रामाणिकपणे प्रयत्न करुन आपण हे नाव कमावलं होतं, लोकांतच्या मनात स्थान निर्माण केलं. मात्र विघ्नसंतोषी लोकांना ते पाहावलं जात नाही म्हणून असे आरोप होतात. मात्र आपण या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करु असं कृष्ण प्रकाश म्हणाले.