गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 13 मे 2022 (15:09 IST)

औरंगजेबाच्या भक्तांनाही त्याच कबरीत पाठवू, राऊतांचा ओवेसींना इशारा

sanjay raut
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (akbaruddin owaisi) यांनी गुरुवारी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यावरुन राज्यातील वातावरण तापलं असून, शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ओवसी यांच्यावर आगपाखड केली. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना एक दिवस त्याच कबरीत पाठवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
 
संजय राऊत म्हणाले, संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक व्हायचं. महाराष्ट्राला खिजवण्यासाठी आणि अशांतता निर्माण करण्याचं ओवेसी बंधूंचं हे राजकारण दिसत आहे. पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की, औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठय़ांनी बांधली आहे. महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर औरंगजेब 25 वर्षे लढत राहिला. औरंगजेब हा काही महान सुफी संत नव्हता. तो एक आक्रमक होता. त्याने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नतमस्तक होताय, एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत पाठवू
 
ओवेसी यांनी गुरुवारी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारीस पठाण हे नेतेही होते. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे नेते गजानन काळे यांनीही ओवेसींवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडेल, असा इशारा दिला आहे.