सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (10:01 IST)

केदारनाथ मंदिराचे कपाट भाविकांसाठी उघडले, भाविकांना दर्शन घेता येणार

Kedarnath
3 मे रोजी उत्तराखंड येथील चारधाम यात्रा सुरु झाली आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे कपाट भाविकांसाठी उघडण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी 6.25 वाजता शुभ मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे कपाट भाविकांसाठी उघडण्यात आले. दोन वर्षानंतर भाविक केदार बाबांचे दर्शन करू शकणार. आता सहा महिने बाबांच्या भक्तांना मंदिरात दर्शन आणि पूजा करता येणार आहे. बाबांच्या मंदिराची  दहा क्विंटल फुलांनी आरास करण्यात आली आहे. गुरुवारी भक्तांच्या जयघोषात भगवान केदारनाथची पंचमुखी डोली आपल्या निवासस्थानी पोहोचली. मंदिराजवळच बाबांची डोली विधीवत स्थापित करण्यात आली आहे. यासोबतच इतर धार्मिक विधी देखील करण्यात आल्या आहेत.
 
शुक्रवारी सकाळी 6.25 वाजता जय केदारच्या जयघोषात भगवान केदारनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडले. केदार मंदिरात बाबांची पंचमुखी मूर्ती ठेवण्यात आली होती. विधी आणि धार्मिक परंपरांनुसार भगवान केदारनाथचे कपाट उघडण्यात आले. पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बाबा केदार पूजा करून आशीर्वाद घेतले.
 
सर्वप्रथम पुजारी व वेदपाठींनी गर्भगृहाची स्वच्छता करून नैवेद्य अर्पण केले. त्यानंतर मंदिरात पूजा करण्यात आली. लष्कराच्या बँडच्या सुरांसह संपूर्ण केदारनाथ भोले बाबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. यावेळी केदारनाथ धामचे रावल भीमाशंकर लिंगा आणि मुख्यमंत्री पाश्कर सिंह धामी यांच्यासह बीकेटीसीचे सदस्य उपस्थित होते. मंदिराची आरास दहा क्विंटल फुलांनी केली आहे.