कोरोनाची लाट संपल्यानंतर लागू होणार CAA कायदा बंगालमध्ये ममता दीदींवर अमित शहांचा घणाघात
कोविडची लाट संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका सभेला संबोधित करताना ही माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, टीएमसी सीएएबद्दल अफवा पसरवत आहे की ते जमिनीवर लागू केले जाणार नाही.
अमित शाह म्हणाले, 'पश्चिम बंगालमधील सत्ताधारी असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष CAA कायद्याबद्दल अफवा पसरवतरंतु मी सांगू इच्छितो की कोविडची लाट संपताच आम्ही सीएए कायदा लागू करू अमित शाह म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जास्त आहेत, कारण ममता बॅनर्जी सरकारनं इंधनावरील स्थानिक कर कमीच केले नाहीत. पश्चिम बंगाल एकमेव राज्य आहे, जिथं पेट्रोल 105 रूपये लिटर आहे."
अमित शाह पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच गोरखा जनतेची दिशाभूल केली. भाजपनेच त्यांचे हित जपले. ते म्हणाले की मी बंगालच्या जनतेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी विधानसभेतील भाजप आमदारांची संख्या तीनवरून 77 पर्यंत वाढविण्यात मदत केली. टीएमसीच्या अत्याचाराविरुद्ध लढत राहणार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. 2021 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा पश्चिम बंगालचा हा पहिला दौरा आहे. अमित शहा गुरुवारी सकाळी कोलकाता विमानतळावर पोहोचले होते, जिथे त्यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि भाजपचे प्रदेश प्रमुख सुकांता मजुमदार यांनी स्वागत केले.