रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (12:05 IST)

पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कमी होईल, मात्र महाराष्ट्राच्या तापमानात होणार वाढ

देशात उन्हाची तीव्रता जाणवत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जारी अपडेटनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात सुमारे 2-3 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. परिणामी देशात येत्या 5 दिवसांत उष्णतेची लाट कमी होईल.
 
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या कमाल तापमानात गेल्या 24 तासांत 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल. दरम्यान, सिमल्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे तेथील तापमान खाली आले आहे. 
 
महाराष्ट्राच्या तापमानात होणार वाढ
बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने वाढ होईल असे हवामान खात्याने संगितले आहे. तर देशाच्या इतर भागात कोणताही विशेष बदल हवामानात होणार नाही. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लात जोरात असून काही भागात तापमानाने 44 अंशाचा पारा गाठला आहे. त्यात कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.