शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (13:34 IST)

भर उन्हात लग्नाच्या वरातीत नाचल्याने तरुणाचा मृत्यू

सध्या सर्वत्र उष्णतेची लाट सुरु आहे. राज्यात परभणी, अमरावती आणि नागपुरात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर कोकण पश्चिम महाराष्ट्रत 19 एप्रिल नंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या परभणीत तापमान 41 अंश सेल्सिअस आहे. 
 
या उष्णतेत उष्माघात होऊन अनेकांना त्रास होतो.अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. परभणीत एक लग्न समारंभात एका तरुणाचा उष्माघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोहम शहाणे असे या मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
 
मित्राच्या लग्नात आलेला तरुण उष्माघाताचा बळी ठरला. परभणी जिल्ह्यात आपल्या मित्राच्या लग्नात हा तरुण भर उन्हात बाईक वरून आला होता. लग्नाच्या पूर्वी देवाच्या पाया पाडण्यासाठी निघालेल्या वरातीत सर्व बेभान होऊन नाचत होते.त्यात सोहम देखील नाचत होता. उन्हात नाचत असल्याने तहान लागली आणि त्याने थंडगार पाणी प्यायले त्यानंतर त्याला अचानक उलट्या होऊन  त्याला अस्वस्थ वाटू लागले त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्याच्या मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोहम हा जिंतूरचे सराफ व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा होता.