बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (10:16 IST)

पराभवानंतर हिमालयात जाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले....

chandrakant patil
"कोल्हापूरमध्ये निवडणूक हरल्यास मी हिमालयात जाईन," असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? असा प्रश्न राजकीय नेते उपस्थित करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
 
ते म्हणाले, "आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला. मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की, मी लढलो आणि जिंकलो नाही तर हिमालयात जाईन. मी लढलोच नाही. नाना लढले."
 
"कोल्हापूरमध्ये तीन पक्ष विरुद्ध भाजपा एकट्याने निवडणूक लढली. विकासाचे मुद्दे मांडले आणि हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. पराभव का झाले याचे चिंतन करण्यात येईल. भाजपमध्ये 15 महिला आमदार आहेत.

जयश्री जाधव भाजपच्या होत्या पण त्यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली. काँग्रेस सत्तेत असल्याने त्यांनी असं केलं. आम्ही सत्तेत असतो तर आमच्याबाजूने लढल्या असत्या."

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ कोथरुडमध्ये 'दादा, हिमालयात कधी जाताय?' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.