बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (12:58 IST)

राज्यात रामनवमीचा उत्साह, मंदिरात भाविकांची गर्दी

Ram Navami
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणि कोरोनाचे निर्बंध काढल्यामुळे यंदाच्या वर्षी सर्व सण मोठया उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे सणासुदीला नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 
 
आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. चैत्र शुद्ध नवमी हिंदूंच्या पंचांगानुसार चैत्र नवरात्रीचा आजचा नववा दिवस आणि या दिवशी विष्णूच्या सातव्या अवताराने म्हणजे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. 
 
 राज्यात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. राज्यातील शेगाव, शिर्डी, पंढरपूर आणि आळंदीमध्ये रामाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. शिर्डी, शेगाव मध्ये राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहे. कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर मंदिरात साजरा होणार हा पहिला उत्सव असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. 
 
रामजन्मोत्सवासाठी आळंदी येथे देखील मंदिराची सजावट करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात श्रीरामाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.