बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (10:11 IST)

एसटी संप: शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्तांवर कारवाई

sharad panwar
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.
 
झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आक्रमण केलं.