सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी, विधी, व्यवस्थापनशास्त्र, बी.एड.,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अनेक उमेदवार भाग घेतात. बारावी नंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी विलंबशुल्क सह अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना आहे.
एम एच-सीईटी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह 15 एप्रिल पर्यंत , आणि विलंब शुल्कासह 16 ते 23 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे.
परीक्षेच्या संभाव्य तारखा -एम एच सीईटी -पीसीएम ग्रुप -11 जून ते 16 जून
पीसीबी ग्रुप - 17 जून ते 23 जून
एमबीए -एमएमएस -24 जून ,25 जून आणि 26 जून
एमसीए -सीईटी- 27 जून
एम आर्च-28 जून
एलएलबी 3 वर्षे -4 जून ते 6 जून
बी.पी एड - 3 जून
बी.एड.एम.एड.-9 जून