शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (07:36 IST)

माझी तुझी रेशीमगाठ’ नेहाचा होणार कायापालट; प्रार्थना बेहरेच्या नव्या लूकचा

majhi tujhi reshimgathi
छोट्या पडद्यावर म्हणजे टिव्हीवर अनेक कौटुंबिक मालिका सुरू आहेत, त्यातच काही मालिका रसिक प्रेक्षकांना खूपच आवडतात. त्यातच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकामधील कलाकारानीं चांगले काम आहे. त्यामुळे छोटी परी असो की अन्य कलाकार प्रेक्षकांना खूप आवडतात. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे.
 
या कलाकारांमुळे मालिकेची लोकप्रियता वाढत आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. नुकतेच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकताच प्रार्थनाचा मालिकेतील नवा लूक समोर आला आहे. प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकताच तिने नेहाच्या व्यक्तिरेखेतील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात प्रार्थना ही छान तयार होताना दिसत असून एक हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना दिसत आहे.