शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:00 IST)

म्हणून नेहाने (प्रार्थना बेहेरे) मागितली माफी; सोशल मिडियात जोरदार चर्चा

prarthana bahare
झी मराठी या दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशिमगाठ मधील प्रसिद्ध नायिका प्रार्थना बेहेरेने प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. या मालिकेमध्ये प्रार्थना ही नेहा नावाचे पात्र साकारत आहे. तर लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे हा मालिकेत यश नावाची भूमिका करीत आहे. रविवारी (१२ जून) रोजी या मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग प्रसारित होणार होता. या भागाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. मात्र, या सर्वांचा मोठा भ्रमनिरास झाला. त्यामुळे नेहाने सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.
 
दोन तासांचा विशेष भाग रात्री ८ वाजता सुरू झाला. नेहा आणि यश यांचे लग्न होणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. तेवढ्यातच काही वेळाने एक जाहिरात प्रसारित झाली. केवळ १० मिनिटांची ही जाहिरात प्रत्यक्ष ४० मिनिटे सुरू होती. त्यामुळे प्रेक्षकांचा मोठा हिरमोड झाला. तांत्रिक अडचणीमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या विवाह विशेष भागात मोठा व्यत्यय आला. त्यामुळेच हा भाग रात्री ८ वाजता सुरू झाला तो अखेर रात्री ११ वाजेपर्यंत प्रसारित करण्यात आला. त्यामुळेच नेहाने सर्वांची माफी मागितली आहे. तसेच, हा विवाह विशेष भाग आज दुपारी ४ वाजता पुन्हा प्रसारित केला जाणार आहे, असे वाहिनीने जाहीर केले आहे.