मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 मार्च 2022 (18:40 IST)

'कच्चा बादाम' गायक भुबन बड्याकरने आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागितली

'कच्चा बादाम' या गाण्याने सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेला गायक भुबन बड्याकरने स्वत:ला सेलिब्रिटी म्हणवून घेतलेल्या 'कच्चा बादाम' गायक भुबन बड्याकरने आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे. या वक्तव्यानंतर भुबन यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती.
 
काही आठवड्यांपूर्वी , पश्चिम बंगालमधील बीरभूमी  जिल्ह्यातील भुईमूग विक्रेते भुबन बड्याकर यांचे 'कच्चा बदाम ' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर भुबनही खूप प्रसिद्ध झाला आणि स्वत:ला सेलिब्रिटी समजू लागला. भुबननेही आता तो सेलिब्रिटी झाला आहे, त्यामुळे भुईमुग विकण्याचे काम कधीच करणार नाही, असे म्हटले आहे. यानंतर भुबनवर सोशल मीडियावर बरीच टीकाही होत होती.
 
गेल्या काही दिवसांतील अपघातानंतर आता भुबनचे पाय पुन्हा एकदा जमिनीवर आले आहेत. आता आपल्या टिप्पणीवर माफी मागून गरज पडल्यास पुन्हा शेंगदाणे विकू, असे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच एका कार्यक्रमात गेलेल्या भुबनने सांगितले की, मला गर्व नाही. तो म्हणाला, 'मला आता कळले की मी असे बोलायला नको होते. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवले आणि गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन .
 
'कच्चा बदाम' गायक पुढे म्हणाला, 'आपल्या सर्वांचे इतके प्रेम मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी एक साधा माणूस आहे आणि माझे आयुष्य असेच जगेन. हे स्टारडम, ग्लॅमर आणि मीडियाचे वेड कायम राहणार नाही. मी आपल्याला  खात्री देतो की एक व्यक्ती म्हणून माझ्यात कोणताही बदल झालेला नाही.
 
 भुबनने 'कच्चा  बदाम' नंतर आणखी काही नवीन गाणी गायली आहेत. त्याने त्याच्या नवीन कार आणि अपघातावर एक गाणे तयार केले. हे गाणे सोशल मीडियावरही व्हायरल झाले. बरं, पुढे काहीही झालं तरी भुबन सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आणि त्याची गाणीही चांगलीच पसंत केली जात आहेत.