शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (20:22 IST)

नवज्योत सिंग सिद्धूच्या पराभवानंतर अर्चना पूरण सिंग ट्विटवरवर ट्रेंड मध्ये

'द कपिल शर्मा शो' हा एक लोकप्रिय टीव्ही शो आहे. त्यात दिसणारे सगळे कलाकार तितकेच लोकप्रिय आहेत. नवज्योत सिंग सिद्धू बराच काळ या शोचे जज होते. त्यानंतर त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह आल्या. सिद्धू राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले. सिद्धू यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवांनंतर अर्चना पूरण सिंग ट्विटरवर ट्रेंड करू लागल्या. युजर्स अर्चनाशी संबंधित मजेदार मीम्स शेअर करत आहेत. लोक म्हणतात की आता अर्चनाची खुर्ची धोक्यात आहे कारण सिद्धू शोमध्ये परत येऊ शकतात. काहींनी म्हटले की, अर्चना पुरण सिंगचे करिअर अडचणीत आले. तर एका युजर ने लिहिले आहे की सिद्धूच्या पराभवानंतर अर्चना ट्रेंड मध्ये