शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 9 मार्च 2022 (13:48 IST)

CID मधील दयाचं मराठी चित्रपटात डेब्यू, Garam Kitly मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

प्रसिद्ध क्राईम शो CID या मालिकेतील प्रसिद्ध कॅरेक्टर दया अर्थातच अभिनेता दयानंद शेट्टी हा आता मराठीत पदार्पण करतोय. नुकत्याच मुहूर्त झालेल्या 'गरम किटली' या मराठी चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
 
गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'गरम किटली' या चित्रपटाची निर्मिती केली जात असून चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहे. मुहूर्त झाल्यानंतर लगेचच 'गरम किटली' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन करणारे राज पैठणकर या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहे. 
 
'दया दरवाजा तोड दो...' हा संवाद खूप प्रसिद्ध असून दया लहानांपासून मोठ्यांचा आवडीचा कलाकार आहे. आता मराठी प्रेक्षकांना आपल्या मातृभाषेतील चित्रपटामध्ये दयाला पहायला मिळणार आहे.
 
'गरम किटली'मध्ये दया नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे सध्या तरी गुपित असून वेळ आल्यावर त्यावरूनही पडदा उठेल असं सांगण्यात येत आहे. यात दयासोबत आदित्य पैठणकर व श्रद्धा महाजन ही नवी जोडी यात दिसणार आहे. विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील आदी कलाकार देखील या चित्रपटाचा भाग आहेत. राज पैठणकरनंच यातील गीतरचना असून, किरण-राज या संगीतकार जोडीनं त्या संगीतबद्ध केल्या आहेत. अनिकेत के. सिनेमॅटोग्राफर, तर योगेश महाजन क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. कपिल चंदन या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर कला दिग्दर्शक म्हणून काम पहात आहेत.