1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (18:57 IST)

अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची 'या' गंभीर आजाराशी झुंज

Actor Naseeruddin Shah's 'Ya' is battling a serious illnessअभिनेता नसीरुद्दीन शाह यांची 'या' गंभीर आजाराशी झुंज  Bollywood Gossips Marathi News  In Webdunia Marathi
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतेच त्यांच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते  ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती इच्छा असूनही आरामात जगू शकत नाही.
 
या स्थितीत ती व्यक्ती कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्य, कविता किंवा भाषणाची पुनरावृत्ती करत असते. त्यांनी  सांगितले की तो झोपेतही या स्थितीत असतात. ते म्हणाले, "प्रयत्न करूनही मला झोप येत नाही. मी गंमत करत नाहीये. ही एक वैद्यकीय स्थिती आहे

या आजाराच्या लक्षणांबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, "या आजारात आपण  एखादे शब्द, वाक्य, कविता किंवा भाषण वारंवार म्हणत राहता. यामागे कोणतेही कारण नाही. आपल्याला  फक्त ते ऐकायला आवडते. मी ते नेहमी करतो. त्यामुळे मी कधीच आरामदायक नसतो. मी झोपत असताना देखील मी या स्थितीत असतो कारण मला ते आवडते."
 
नसीरुद्दीन शाह अलीकडेच शाहिद कपूरची बहीण सना कपूरच्या लग्नात दिसले  होते. येथे ते पत्नी रत्ना पाठक शहा यांच्यासोबत आले होते.