बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (14:56 IST)

सुझैन आणि दोन्ही मुलांनाही हृतिक रोशनची नवी गर्लफ्रेंड सबा आझाद आवडते

बॉलीवूडचे सुपरस्टार हृतिक रोशन आणि सबा आझाद फेब्रुवारीमध्ये एकत्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडले होते आणि तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत होते. दोघांच्या डेटींगच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, तरीही दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल किंवा या बातम्यांबद्दल काहीही सांगितलेले नाही.
 
पण रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे. नुकतेच एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, हृतिक आणि सबा लग्नाच्या तयारीत आहेत. पण दोघांच्या एका मित्राने लग्नाच्या बातमीवर उत्तर देताना बरेच काही सांगितले आहे.
 
वृत्तानुसार, हृतिक आणि सबा खरोखरच एकमेकांना आवडतात आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नात्याबद्दल चांगलेच सहमती दर्शवली आहे. आणि एवढेच नाही तर त्याला सबाचे संगीत कामही खूप आवडते.
 
सूत्राने सांगितले की, “अलीकडेच जेव्हा ती हृतिकच्या घरी पोहोचली तेव्हा तिने एक रैंडम जैमिंग सेशन केले जे ऋतिक आणि त्याच्या कुटुंबाला खूप आवडले. हृतिक आणि सबा नक्कीच एकत्र आहेत पण दोघांनाही घाईघाईने कोणताही निर्णय घेयचा नाहीये.”
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saba Azad (@sabazad)

सूत्रांप्रमाणे सबाने हृतिकच्या कुटुंबाची मने जिंकली आहेत ज्यात अभिनेत्याची माजी पत्नी सुझैन खानचा समावेश आहे. इतकंच नाही तर हृतिकची दोन्ही मुलं – रिदान आणि रेहान हे देखील सबावर खूप प्रभावित आहेत. सबा आजकाल अनेकदा हृतिकच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
 
हृतिक आजकाल अनेकदा सबाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसतो आणि दोघांच्या सोशल मीडिया संवादानंतर त्याचे चाहते गणित जुळवत बसतात. सबा एक अभिनेत्री आणि संगीतकार दोन्ही आहे आणि नुकतीच सोनी लिव्हच्या रॉकेट बॉईज मालिकेत दिसली होती.