शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (11:55 IST)

Big Boss Marathi मधून स्नेहा वाघ बाहेर, 'या' कारणांमुळे झाली होती ट्रोल

अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली आहे.
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये ती सुरुवातीपासूनच चर्चेत होती. सुरुवातीला ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली.
त्यानंतर तिची 'गुड मॉर्निंग' म्हणण्याची स्टाईल आणि जय दुधाणेसोबतची जवळीक यामुळेही ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतपर स्नेहानं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तिनं म्हटलंय, "बिग बॉस मराठीचा प्रवास खूप सुंदर होता. त्यातून खूप काही नवीन शिकायला मिळालं. या प्रवासात माझ्या चांगल्या-वाईट प्रसंगी तुम्ही नेहमीच माझ्यासोबत ताकदीने उभे राहिलात. तुम्ही दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही व नेहमीत तुमची आभारी राहीन."
 
पहिला पती आविष्कारबद्दल केलं होतं 'हे' वक्तव्यं
स्नेहा वाघ आणि अभिनेता अविष्कार दारव्हेकर हे लग्नानंतर काही वर्षांनी विभक्त झाले. पण, बिग बॉस मराठी या शोच्या निमित्तानं ते अनेक वर्षांनी एकाच छताखाली आले होते. त्यावेळी ते दोघे एकत्र आल्यानंतर घरात कसं वातावरण असेल याबद्दल उत्सुकता होती.
पण आविष्कार आणि स्नेहामध्ये फारसा तणाव दिसला नाही. घरात स्नेहाचा वाढदिवस झाला तेव्हा आविष्कारने तिला शुभेच्छाही दिल्या.
मात्र याच शोमध्ये एकदा सुरेखा कुडची यांच्याशी बोलताना स्नेहानं तिला आविष्कार कसा मारहाण करायचा हे सांगितलं होतं. हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला होता.
याच शोमध्ये बोलताना स्नेहा म्हणाली, 'एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची. शूटवर जाताना देखील माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या.'
स्नेहाने 2015 मध्ये इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत दुसरं लग्न केलं.
 
पण तिचे ते लग्नही फार काळ टिकू शकले नाही. स्नेहा अवघ्या 8 महिन्यांनंतर पतीपासून विभक्त झाली. जरी दोघे अधिकृतपणे घटस्फोटित नसले, तरी ती म्हणते, की ती लवकरच त्याला घटस्फोट देईल.
 
जय दुधाणेसोबत जवळीक
जय दुधाणे आणि स्नेहा यांच्यात जवळीक असल्याची चर्चा रंगली होती.
एकदा एक टास्क संपल्यानंतर जय आणि स्नेहा रात्री दिव्यांच्या प्रकाशात एकमेकांशी मस्ती करताना दिसले. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा झाली.
दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न हा व्हीडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी विचारला होता.
रोज सकाळी स्नेहा झोपेतून उठल्यावर बिग बॉसच्या घरात लावलेल्या कॅमेरा समोर येत होती. 'सरांगे बिग बॉस', गुड मॉर्निंग' असं म्हणत होती.
'सरांगे' म्हणजे काय? असाही अनेकांना प्रश्न पडला होता, तर सरांगे हा एक कोरियन शब्द आहे. सरांगे याचा अर्थ 'आय लव्ह यू' असा होतो. सारंगी बिग बॉस म्हणजेच 'बिग बॉस आय लव्ह यू.'
 
कोण आहे स्नेहा वाघ?
हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा असलेली स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातली स्पर्धक होती.
स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
तिन ज्योती, वीरा, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्य या हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.