गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (21:51 IST)

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरदार व्हायरल

siddarth Jadhav
सध्या कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू असताना अचानक अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरदार व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि तृप्तीनं २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे आडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपुर्वी हे कपल दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले होते. पण दोघांचं इन्स्टा चेक केलं असता दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो दिसत नाहीये.