सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (19:52 IST)

हर्ष लिंबाचियाने शेअर केले कौटुंबिक फोटो, भारती बाळाला हातात घेताना दिसली

फोटो साभार- सोशल मीडिया टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन जोडपे भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही दाखवत असतात. नुकताच हर्षने एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. 
 
सर्वप्रथम, भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया एका रिअॅलिटी शोच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. येथूनच दोघे एकमेकांचा प्रेमात पडले आणि काही काळ डेट केल्यानंतर भारती आणि हर्षने 2017 मध्ये लग्न केले. लग्नाच्या जवळपास पाच वर्षानंतर 3 एप्रिल 2022 रोजी दोघेही एका गोंडस मुलाचे पालक झाले आहेत. सध्या हे जोडपे आपल्या मुलासोबत पालकत्वाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे. मात्र तरीही तो त्यांना प्रेमाने 'गोला ' म्हणतात.
 
14 जून 2022 रोजी हर्ष लिंबाचियाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक कौटुंबिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हर्ष आणि भारतीसोबत त्यांचा मुलगा गोला ही दिसत आहे. भारती तिच्या बाळाला आपल्या हातात धरून आहे. मात्र, त्यात त्यांच्या मुलाचा चेहरा दिसत नाही. त्याचवेळी हर्ष हसताना दिसत आहे. हे शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "फॅमिली." आणि त्यासोबत रेड हार्ट इमोजी देखील बनवला आहे.
 
हर्ष आणि भारती त्यांच्या यूट्यूब चॅनल 'लाइफ ऑफ लिंबाचियास (एलओएल)' द्वारे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या जीवनाबद्दल अपडेट देतात. भारती यांच्या मुलाचा जन्म होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्याप तिने आपल्या मुलाचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या चिमुकल्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे.