1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (12:14 IST)

'जोकर' या हिंदी वेब सिरीजमधून झळकतेय तेजश्री जाधव

joker
दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठी मुलगी तेजश्री जाधव सध्या एमएक्स प्लेअर वरील 'द जोकर: अ स्ट्रेंज किडनेपर' या हिंदी सिरीजमधून झळकत आहे. 'अट्टी' या तामिळ फिल्म नंतर ती 'अकीरा', 'माधुरी टॉकीज' ह्या हिंदी सीरिजमध्ये देखील दिसून आली होती. 
tejashree
तेजश्री ने माटुंग्याच्या रूईया कॉलेजमधून प्रयोगिक नाटकाचे धडे गिरवले असून, मराठी रंगमंचानेच माझ्यात अभिनयाचे पैलू पाडले असल्याचं ती सांगते. नेहमी ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसणारी तेजश्री जोकर मध्ये वेगळ्या व्यक्तीरेखेत दिसून येणार आहे. यात ती हिंदी कलाकार हितेन तेजवानी सोबत झळकणार आहे. 
'द जोकर: अ स्ट्रेंज किडनेपर' हा एक थ्रिलर पट असून यांत मंगेश देसाई यांची देखील विशेष भुमिका आहे.