रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (12:54 IST)

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी अभिनित 'बंटी और बबली 2' ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या 'बंटी और बबली 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातून तब्बल 12 वर्षांनंतर सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत.
 
 या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 3 मिनिटे 11 सेकंदांच्या या ट्रेलरवरून संपूर्ण कथेचा अंदाज लावला जाऊ शकतो. हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली या अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी अभिनीत चित्रपटाचा सिक्वेल आहे.
 
गेल्या 'बंटी और बबली' मध्ये, जिथे अमिताभ बच्चन ठगांना पकडताना दिसले होते, यावेळी पंकज त्रिपाठी पोलीसवालाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात ठगांच्या दोन जोड्या आहेत. पहिली जोडी सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची आहे तर दुसरी सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीची आहे.
 
सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी बंटी आणि बबलीच्या नावाने लुटतात. यानंतर पोलिसांना वाटते की जुने बंटी आणि बबली परत आले आहेत. पोलीस सैफ आणि राणीला अटक करतात. सैफ आणि राणी एका खेळाची योजना आखतात आणि खऱ्या बंटी आणि बबलीची नावे कोण वापरत आहेत हे शोधण्यासाठी एक मिशन सुरू करतात.
 
'बंटी और बबली 2 ' 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे.