शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (15:56 IST)

सैफ-राणी पुन्हा झळकणार एकत्र; ‘बंटी और बबली २’चा टिझर रिलीज

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बंटी और बबली २’चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. २००५साली आलेल्या बंटी और बबली या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे बंटी बबलीच्या प्रमुख भुमिकेत होते. मात्र आता बंटी बबली २ मध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आपल्याला दीसणार आहेत.
टिझरची सुरुवातीला राणी मुखर्जी आणि सैफ अली खान दीसत आहेत. दोघेही आपल्या लुकला टच अप देत असताना राणी सैफला आपण किती वर्षांनी एकत्र काम करतो ना असे विचारते. सैफ म्हणतो १२ वर्षांनी. त्यावर सैफ सोबत काम करणे मी फार मिस केले असे राणी त्याला म्हणते.

पुढे टीझरमध्ये सैफ आणि राणी एकमेकांचे कौतुक करत असतानाच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शार्वरी फ्रेममध्ये येतात. आम्ही सुद्धा शुटसाठी तयार आहोत.असे ते म्हणतात त्यावर राणी आणि सैफ त्यांना तुम्ही कोण असे विचारते त्यावर ते दोघे आम्ही बंटी और बबली आहोत असे सांगतात. राणी इथे बंटी और बबली फक्त आम्हीच आहोत असे म्हणते. तर डिरेक्टर आदित्य चोप्राने स्क्रिप्ट चेंज केल्याचे सांगते.