गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (11:49 IST)

'Friends' मधील Gunther चे निधन

लोकप्रिय सिटकॉम 'Friends' मधील कॉफी शॉप मॅनेजर Gunther साकारणारा अभिनेता James Michael Tyler याचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. अमेरिकेत कॅन्सरशी झुंज देता देता जेम्स माइकल याने लॉस एंजेलिस मधील त्याच्या राहत्या घरीच शेवटचा श्वास घेतला. 
 
अमेरिकन मीडीया रिपोर्ट्स नुसार, अभिनेता Prostate Cancer शी झगडत होता. पहिल्यांदा त्याला 2018 साली कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांनी जूनमध्ये सांगितले की त्यांच्यावर केमोथेरपी होत आहे. या वर्षीच्या फ्रेंड्स रीयूनियनमध्ये जेम्स झूमच्या माध्यमातून जोडला गेला. ब्राइटने ट्विट केले, 'जेम्स मायकेल टायलर, आमचे गंथर, यांचे काल रात्री निधन झाले. ते एक अद्भुत व्यक्ती होता ज्याने आपले शेवटचे दिवस इतरांना मदत करण्यात घालवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, गंथर सदैव जगेल.'
 
जेम्सच्या मॅनेजरने सांगितले की, 'फ्रेंड्स शोचा सातवा मित्र म्हणून जग त्याला ओळखते पण जेम्स एक अभिनेता, संगीतकार, कॅन्सर जागरूकता अधिवक्ता आणि एक प्रेमळ पती होता'. फ्रेंड्स शोमध्ये, जेम्सने सेंट्रल पर्क कॉफी शॉपमध्ये काम करणारा वेटरच्या भूमिकेत होता. संपूर्ण शोमध्ये, गंथरचे रेचेल (जेनिफर अॅनिस्टन) वर एकतर्फी प्रेम दाखवण्यात आले आहे आणि एक दिवस ती देखील त्याच्या प्रेमात पडेल असे स्वप्न बघत असतो. गंथर म्हणजेच मायकेलच्या शोमध्ये राहण्याचे खूप मजेदार क्षण होते. जेम्स सबरीना द टीनेज विच आणि स्क्रब्समध्ये देखील दिसला आहे.