प्रसिद्ध टिव्ही अभिनेता करणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Last Modified बुधवार, 15 जून 2022 (21:20 IST)
छोट्या पडयावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख असलेला अभिनेता करणवीर बोहरा आता एका प्रकरणात अडकला आहे. या अभिनेत्याबाबत एक गोष्ट उघडकीस आली आहे. एका 40 वर्षीय महिलेने करण आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात करणवीरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने याबबत वृत्त दिले आहे. एका 40 वर्षीय महिलेने करणवीरवर आरोप केला आहे की, 2.5 % व्याजावर पैसे परत करण्याचे आश्वासन करणवीरने दिले होते. पण त्याने केवळ १ कोटी रुपये परत केले आहे.

महिलेने या तक्रारीत आपली ९९ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच, तिच्याकडून सहा जणांनी १ कोटी ९९ लाखांची रक्कम घेतली होती. ही रक्कम २. ५ टक्के व्याजासह परत करण्याचा करार त्यांच्यात झाला होता. मात्र या महिलेला आतापर्यंत फक्त १ कोटी रुपयेच परत करण्यात आले आहे. त्यामुळे बाकीचे पैसे आणि व्याज परत मिळवण्यासाठी या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेने पुढे म्हटले आहे की, जेव्हा ती करणवीरकडे आपल्या पैशांची मागणी करायला गेली, त्यावेळी करणवीर आणि त्याच्या पत्नीने तिला योग्य प्रतिसाद दिला नाही. तसेच तिला गोळ्या घालण्याची देखील धमकी दिली. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, करणवीर याने कंगना रनौत हिच्या ‘लॉकअप’
या रिॲलिटी शोमध्ये आपल्यावरच्या कर्जाचा खुलासा केला होता. करणवीर याने अनेक कार्यक्रमात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘एक से बढ़कर एक’, ‘कुबूल है’, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘नागिन 2’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक, एकदा तरी भेट द्या
गुजरातमध्ये पर्यटनाची अनेक केंद्रे असली तरी, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले ...

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी ट्रोल
अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी. ‘कबीर ...

Marathi Joke: बायकोचा राग

Marathi Joke: बायकोचा राग
रात्री नवरा बायकोचं भांडण झालं, सकाळी बायको रागात उठलीच नाही, बिचाऱ्या नवऱ्यानं ...

Mukesh Khanna: मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश ...

Mukesh Khanna:  मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश खन्ना यांच्यावर महिला आयोगाची कारवाईची मागणी
अभिनेते मुकेश खन्ना आता मुलींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे अडकल्याचे दिसत आहे. ...

Marathi Joke: बायकोची सवय

Marathi Joke: बायकोची सवय
नवरा बायको हातात हात धरून बाजारात फिरत होते त्यांना पाहून नवऱ्याचा मित्र म्हणाला- अरे वा ...