1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (08:10 IST)

अकोल्यात भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

accident
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर कारंजा रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या पती पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला, या प्रकरणी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक आणि चालकालाही ताब्यात घेतले आहे.
 
अकोल्यातील मुर्तीजापूर वरून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दहातोंडे फाटा येथे आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ४ टीडी २२८३ क्रमकांचा ट्रक आणि ज्युपिटर क्रमांक एमएच ३७ एस ५७३७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
ही घटना मुर्तीजापूर कारंजा मार्गावरील दहातोंडे फाट्यावर घडली. विनोद वासुदेवराव वानखडे (वय ५५) आणि पत्नी सविता विनोद वानखडे (वय ५०) असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृतक हे धनज बु जवळील मेहा येथील रहिवाशी आहेत. याची माहिती मूर्तिजापूर येथील आपत्कालीन संस्था सुनील लक्ष वाणी यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिका रवाना केली होती.
 
या प्रकरणी मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सत्यजीत मानकर यांनी अपघातची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात याला मदद करण्यासाठी भाजप आमदार हरिष पिंपळे द्वारा संचालित आपातकालीन पथक मोफत सहकार्य केले. दोघा पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती वानखेडे कुटुंबियांना मिळतात, त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. परिसरात देखील शोकाकुळ वातावरण आहे.