1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 7 जून 2022 (21:58 IST)

धक्कादायक.! पतीने पत्नीवर वार करत स्वतः केली आत्महत्या

suicide
सध्या शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरु असून आज दुपारी पुन्हा एकदा नाशिकच्या म्हसरूळ (mhasarul) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत, स्वतः आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर पतीने घरावरून उडी घेत आत्महत्या करून आपला जीव संपवला आहे.
 
नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरातील ही घटना आहे. म्हसरूळच्या रामकृष्ण नगर येथील लक्ष्मी अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर ६ येथे ही घटना घडली. घरगुती वादातून पती-पत्नीत भांडण झाल्याने, त्याचे पर्यवसन या गंभीर घटनेत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच पतीचा पत्नीवर संशय असल्याने तो सतत पत्नीला त्रास देत होता. पतीने केलेल्या या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झालेली आहे. तर पतीचा मृत्यू (death) झाला आहे. राजू रतनसिंग ठाकूर (वय ५०) असे या आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पतीने पहिले पत्नी चंदा राजूसिंग ठाकूर (वय ४५) हिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर पतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
 
दरम्यान, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. दरम्यान, या गंभीर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, गेल्या १९ मे रोजी म्हसरूळ परिसरात २४ वर्षीय तरुणाची (youth) धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यश रामचंद्र गांगुर्डे असे २४ वर्षीय मुलाचे नाव आहे. पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या (murder) करण्यात आली होती. म्हसरूळ (Mhasarul) परिसरातील दिंडोरी रोडवर या युवकाची हत्या करण्यात आली होती.