शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:13 IST)

पाणी भरताना महिला पडली विहिरीत

water draught
राज्यातील विविध भागांत सध्या भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशीच परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा आहे. नाशिकच्या बोरीची बारी या गावात ऐक धक्कादायक घटना घडली आहे. पाणी भरण्यासाठी गेलेली महिला थेट विहिरीत कोसळली. 
 
पाण्यासाठी वणवण करणार्‍या महिला आपला जीव धोक्यात टाकत पाणी भरत आहे. अशाच प्रकारे एक महिला पाणी भरण्यसाठी गेली असता तिचा तोल गेला आणि ती थेट विहिरीत पडली.