शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (19:30 IST)

EK DON TEEN CHAAR -‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’या नवीन चित्रपटाची घोषणा !

जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे, वैदेही आणि निपुणची सरप्राईजवाली हटके लव स्टोरी लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहांत...
 
मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट आपल्या भेटीला येणारं आहे. एक नाविन्यपूर्ण अशी जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे.
 
आणि महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित ‘मुरांबा’या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे.
 
निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण 23 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत!
या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणारं आहे.
 
‘एक दोन तीन चार’बद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, “आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे जोडपं घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरी’सर्वांनाच आपलीशी वाटेल.”
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि16 बाय 64 प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपूण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.