रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जानेवारी 2021 (16:30 IST)

गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच झालं आहे. 'डाव' सिनेमातील 'अंधार' असं हे गाणं आहे. 
 
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या अंधार सिनेमाचं गाणं आहे. 'डाव' या सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. हे गाणं लेखक मंदार चोळकरने लिहिलं असून संगीत जीत गांगुलीचं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कनिष्क वर्माने केलं आहे. 
 
सागरिका घाटगेचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. तर अभिनेता गुलश देवैया या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गुलशन मराठी शिकला आहे.