गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (08:09 IST)

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका, नेमकं काय झालं?

Shreyas Talpade
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. शुटिंग संपून घरी आल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयसची अँजिओप्लास्टीही तातडीने करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
 
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाने काय म्हटलं आहे?
 
रुग्णालयाने हे म्हटलं आहे आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच आता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा आहे. श्रेयस तळपदे दिवसभर चित्रीकरण करत होता. त्यावेळी त्याला काहीही झालं नाही. तो घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थता जाणवू लागली. त्याची पत्नी दिप्ती याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्याच दरम्यान त्याला चक्कर आली.
 
श्रेयस तळपदेने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये नाव कमावलं आहे. इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा आहे. ओम शांती ओम या सिनेमात तो शाहरुख खान सह झळकला होता. तसंच पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला त्याने आवाज दिला होता. त्यामुळे त्याच्या आवाजाची वाहवा झाली होती. गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल 2 अशा अनेक हिट सिनेमांमध्ये श्रेयस तळपदेने काम केलं आहे. इमर्जन्सी या कंगनाच्या सिनेमात श्रेयस तळपदेने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं पात्र साकारलं आहे.

वेलकम टू जंगल या सिनेमाचं चित्रीकरण संपवून श्रेयस तळपदे घरी आला आणि त्याला अस्वस्थता जाणवली. या सिनेमात अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन, लारा दत्ता, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, जॉनी लिवर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव आणि मिका यांच्या भूमिका आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor