1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Famous Marathi actress Pooja Sawant's car accident

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा अपघात,थोडक्यात बचावली

अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा अपघात झाला असून सुदैवाने ती थोडक्यात बचावली आहे. 
अभिनेत्री पूजा सावंत ही चित्रपट कपबशीच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमासाठी  पुणेहून सांगली जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात तीन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
या वाहनांत अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे यांचा समावेश होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. अपघातामुळे काहींना किरकोळ मुका मार  लागला आहे. अपघातस्थळी काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 
 कप बशी” या चित्रपटाची निर्मितीसुकल्प चित्र निर्मिती संस्थेने केली असून चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी आहे. चित्रपटाची प्रस्तुती बिग ब्रेन प्रॉडक्शनचे निलेश रागोपाल राठी यांनी केली आहे. दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे असून चित्रपटाची पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले आहे तर संगीत सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे आहे. 
गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे. कॅमेरामनबाळू दहिफळे, संकलनआशिष म्हात्रे यांचे तर ध्वनी संयोजन मंदार कमलापूरकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड चिन्मय शिंत्रे, लूक डिझाइन श्रीकांत देसाई यांचे असून चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख प्रमुख भूमिकेत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
'तुमच्या मुलीने तसले कपडे घातले तर!' अंगप्रदर्शनाबाबतच्या दिग्दर्शकाच्या मागणीवर भडकल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख